कोडोली मध्ये विशेष अध्यात्मिक सभा उसाहात
कोडोली वार्ताहर-
पन्हाळा परिसरात ख्रिस्तजयंती मोठया उसाहात साजरी केली जात आहे. कोडोली येथे ख्रिस्तजयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तीन दिवसीय अध्यात्मिक सभा व आजारी लोकांवर विशेष प्रार्थनाचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेचे आयोजन गोस्पल बॉईजच्या वतीने करण्यात आले. या तीन दिवसीय अध्यात्मिक सभेत पुणे येथील आकट्स फौंडेशनचे पा.डॉ.रोहित भोसले यांनी मार्गदर्शन केले, तर सिस्टर कोमल भोसले यांनी त्यांना सहकार्य केले. या अध्यात्मिक सभेची सुरुवात देवाच्या गाण्यांनी व भक्तीने केली जात होती. पा.डॉ.रोहित भोसले यांनी अध्यात्म वाढ व तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहण्यावर मार्गदर्शन केले. या सभेचे कोडोली विभागातील पदाधिकाऱ्यांनी तसेच कोडोली परिसरातील ख्रिस्ती बांधवांनी या तीन दिवसीय अध्यात्मिक सभेचा लाभ घेतला..