ऐरोली जवळ रुळांना तडे : रेल्वे ची साडेसाती
मुंबई : येथील ट्रान्सहार्बर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ रुळांना तडे गेल्याचे आढळल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. नुकत्याच घडलेल्या पश्चिम मार्गावरील अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ पूल कोसळला होता. त्यामुळे पश्चिम मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
एकंदरीत रेल्वे खात्याच्या मागील साडेसाती अद्याप संपलेली दिसत नाही.
दरम्यान हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत होत आहे.