शाहुवाडीच्या राजकीय पटलावर येतोय नवा वसा आणि वारसा : अमरसिंह पाटील भैय्या
बांबवडे : शाहुवाडी तालुक्याच्या राजकीय व्यासपीठावर एक नवं नेतृत्व उगवत आहे. आपल्या घराण्याचा राजकीय वसा आणि वारसा घेवून पुढे येत आहेत,ते भेडसगांवचे युवा सरपंच अमरसिंह पाटील भैय्या .
हे नवं नेतृत्व कौतुकास्पद वाटलं ते नुकत्याच झालेल्या भेडसगांवच्या कुस्ती मैदानामुळे. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या , सहकार्याने केलेलं नेटकं नियोजन निश्चितच मनाला भावलं. बुजुर्ग नेतृत्वांना दिलेला आदर आणि तरुणाईला सोबत घेवून केलेलं कुस्ती मैदान बघण्यासारखं होतं.
शाहुवाडी तालुक्याच्या राजकीय व्यासपीठावर अनेक तरुण, आपलं राजकीय भवितव्य आजमवण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत . अनेक नेत्यांची भावी पिढी राजकारणात उतरत आहे. परंतु या सगळ्यांना राजकीय मोठा वारसा आणि पाठींबा लाभला आहे. अमरसिंह यांना देखील राजकीय वारसा आहे. त्यांचे आजोबा केशव पाटील. लोक त्यांना आदराने कारभारी म्हणंत. परंतु हे कारभारी नेतृत्व, कार्यकर्त्यांतून निर्माण झालं होतं. त्यानंतर त्यांचे चिरंजीव हंबीरराव पाटील बापू यांनी मात्र आपल्या राजकारणाची धुरा स्वतः च सांभाळली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अमरसिंह पुढे येत आहेत. त्यांनी केलेलं राजकीय पदार्पण हे कार्यकर्त्याच्या भूमिकेतून केलं आहे, हेच त्यांचं कौतुक आहे.
राजकारणात, राजकारणाची पहिली पायरी असते ती म्हणजे ‘ ग्रामपंचायत ‘. याच ग्रामपंचायत मध्ये निवडणूक जिंकून अमरसिंह सरपंच झालेत. थेट जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती असं न करता ग्रामपंचायत च्या माध्यमातून केलेला राजकीय प्रवेश हा युवा नेतृत्वाच्या उज्वल भवितव्याची चाहूल करून देतं. कारण इथंच सर्वसामान्य जनतेच्या व्यथा समजून घेता येतात. आणि ज्या नेतृत्वाला सामन्याच्या व्यथा कळल्या, ते नेतृत्वं बहरायला फार वेळ लागत नाही. त्यात हे व्यक्तिमत्व उच्च शिक्षित असल्याने कुणीही यावं आणि कानात सांगावं, असं घडणार नाही. म्हणूनच ‘ बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ‘. हेच यावरून समजतं. त्यांच्या राजकीय वाटचालीस साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने खूप खूप शुभेच्छा…