आंबवडे चे मुख्याध्यापक संभाजी जाधव यांची महामंडळ कौन्सिल पदी निवड
पैजारवाडी : आदर्श हायस्कूल आंबवडे चे मुख्याध्यापक संभाजी जाधव यांची महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळ कौन्सिल पदी निवड झाली असून, तशा आशयाचे नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळ चे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी दिले.
मनमिळावू आणि आवडीचे शिक्षक या पदावर नियुक्त झाल्याने विद्यार्थी आणि परिसरातील नागरीकातून अभिनंदन करण्यात येत आहे.