लोकनेते सरुडकर दादांचा अमृतमहोत्सव ‘ ना भुतोनभविष्यती ‘ असा संपन्न होणार : कार्यकर्त्यांचा निर्धार
बांबवडे : लोकनेते माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. या निमित्त बांबवडे इथं झालेल्या बैठकीत पिशवी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी या अमृत महोत्सव सोहळा निमित्त कंबर कसली असून, आपल्या लोकनेत्याचा हा सोहळा थाटामाटात संपन्न करण्याचा संकल्प केला आहे.
यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती श्री नामदेवराव पाटील सावेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, आपल्या लोकनेत्यांचा अमृतमहोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न करायचा आहे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली नेमून दिलेली कामे व्यवस्थित पार पाडावी,जेणेकरून हा सोहळा चांगल्या रीतीने संपन्न करू या. यानिमित्त रक्तदान शिबीर, कुस्त्यांचे आयोजन ,तर ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. अशा भरगच्च कार्यक्रमांनी आपल्या लोकनेत्याचा अमृतमहोत्सव सोहळा संपन्न करण्याचा मानस सावेकर दादांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
बाबासाहेब पाटील सरुडकर दादांचा हा अमृतमहोत्सव सोहळा ‘ ना भुतोनभविष्यती ‘ करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर करण्यात आला.
यावेळी रविवार दि.४ फेब्रुवारी रोजी शित्तूर तर्फ मलकापूर इथं रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरास पिशवी मतदारसंघातील युवकांनी रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यात सहभाग मिळवावा,आणि यानिमित्त आपल्या लोकनेत्यांना दीर्घायुरोग्य लाभो, अशी हि प्रार्थना करू या,असे आवाहन सरुडकर दादा समर्थक माजी सरपंच रामभाऊ कोकाटे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेवराव गिरी, श्री अतिग्रे, गामाजी ठमके, संदीप पाटील ( पिशवी ) आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केलीत. यावेळी पिशवी मतदारसंघातील सरुडकर दादा प्रेमी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक ससेगाव चे माजी सरपंच सुरेश पारळे यांनी केले तर आभार आर.डी. पाटील यांनी मानले.