…अखेर सापडल्या : लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई
मलकापूर : शाहुवाडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ प्रतिभा शिवाजीराव सुर्वे (वय 57 )यांनी सेवा पुस्तक व अंतीम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा बदली महिला शिक्षिका कडून सहा हजार रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगे हात पकडले,तर या प्रकरणी शिक्षण विभागाचे कनिष्ठ लिपिक नितीन नाथा राबाडे यांना ही एक हजार रूपये लाच मागितले प्रकरणी ताब्यात घेतले .या प्रकरणात सुर्वे यांनी दहा हजाराची मागणी केली होती मात्र तडजोडी अंती ते सहा हजारावर आले होते .या कारवाईची . शाहुवाडी तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुळ तक्रारदार यांच्या पत्नी या मोळवडे तालुका शाहुवाडी येथे दहा वर्षा पासून त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.विनंती वरून त्यांची नंदूरबार जिल्हापरिषद येथे बदली झाली आहे .त्यांचे सेवा पुस्तक व अंतिम वेतन प्रमाण पत्र शाहुवाडी पंचायत समितिच्या गटशिक्षणाधिकारी यांनी न पाठविल्याने त्यांचे वेतन मिळाले नव्हते.तर मुळ तक्रारदार यांच्या मेव्हणी ही परळे तालुका शाहुवाडी येथे कार्यरत होत्या .त्यांची बदली ही धुळे जिल्हा परिषदेकडे झाली आहे .त्यांना ही सेवा पुस्तक व अंतिम वेतन प्रमाण पत्र घेऊन जाण्यासाठी गटशिक्षणाधिकारी प्रतिभा सुर्व्हे यांना 13जुलै रोजी भेटले असता त्यांनी मुळ तक्रारदार यांच्याकडे पत्नी व मेव्हणी यांचे सेवा पुस्तक देण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रूपयाची मागणी केली होती.तर अंतिम वेतनप्रमाणपत्र देण्यासाठी कनिष्ठ लिपीक नितीन राबाडे यांने 1000 रूपयाच्या लाचेची मागणी केली .मात्र मुळ तक्रारदार यांनी संबधीताना लाच न देता अॅन्टी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे 16 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनुसार 17जुलै रोजी शाहुवाडी पंचायत समिती येथे पंच व साक्षीदारासह पडताळणी केली असता मिळालेल्या माहिती नुसार 17जुलै रोजी शाहुवाडी पंचायत समिती येथे पंच व साक्षीदारासह पडताळणी केली असता गटशिक्षणाधिकारी सुर्वे यांनी मुळ तक्रारदार यांचे पत्नी व मेव्हणीचे सेवा पुस्तक देणेकामी प्रतेकी तीन हजार रूपये प्रमाणे सहा हजार रूपयाची लाच मागितल्याचे निष्पन झाले नंतर सुर्वे यांनी पंच साक्षीदार समक्ष तक्रारदार यांचे कडून सहा हजार रूपये घेताना रंगे हाथ पकडले .तर शिक्षण विभागाचे कनिष्ठ लिपिक नितीन राबाडे याने एक हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन झालेने वरील दोघांना सापळा कारवाई अंतर्गत ताब्यात घेऊन .गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे .
सदर कारवाई पोलीस उप आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे संदीप दिवाण,अपर पोलीस उपआयुक्त आर आर गायकवाड,पोलीस उपअधीक्षक गिरीश गोडे ,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक ,एम के पाटील,सहाय्यक फौजदार,मनोहर खनगांवकर ,पोलीस नाईक,आबासो गुंडणके,संदीप पावलेकर,श्री कृष्णात पाटील पो.काॅ.छाया पाटोळे,हवालदार सुरज अपराध आदिनी ही कारवाई केली .