पैजारवाडी येथे ट्रक पलटी होऊन अपघात : चालक जखमी
पैजारवाडी :
पैजारवाडी येथे ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला.
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पैजारवाडी (ता.पन्हाळा )येथील बस स्थानका नजीकच्या अवघड वळणावर भरधाव वेगाने जाणारा बग्यास भरलेल्या ट्रकवरील (MH 10 A 2421) चालकाचा ताबा सुटल्याने, नाल्यात पलटी होऊन अपघात झाला.
या अपघातात चालक राजू नदाफ हा गंभीर जखमी झाला असून, ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे .हा अपघात सायंकाळी सहा च्या सुमारास घडला. अपघाती ट्रक कोल्हापूरच्या दिशेने जात होता.