‘ गोकुळ ‘ सहकारातील सर्वोत्तम दुध संघ -काँग्रेस सरचिटणीस मोहन प्रकाशजी
कोल्हापूर : ‘ गोकुळ ‘ हा सहकारातील सर्वोत्तम दुध संघ असून, गोकुळ ने ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांना त्यांचा आर्थिकमान उंचावण्यासाठी सहकार्य केले असून, त्यांचा विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. असे मत राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाशजी यांनी गोकुळच्या गौरव संदर्भात व्यक्त केले. दिल्लीत गोकुळ चे ज्येष्ठ संचालक व माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
या सदिच्छा भेटीत अरुण डोंगळे यांनी मोहन प्रकाशजी यांना गोकुळ दुध प्रकल्पास भेट देण्याबाबत निमंत्रण दिले. मोहन प्रकाश यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. आणि गोकुळच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.