बचपन इंटरनॅशनल अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
कोडोली वार्ताहर :
कोडोली ता.पन्हाळा येथील केदार शिक्षण पसारक मंडळ यांचे बचपन स्कुल/बी.के.इंटरनॅशनल अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उसाहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हापूर जिल्हाचे शिक्षण अधिकारी किरण लोहार व पन्हाळा तालुक्याच्या बीडीओ प्रियदर्शनी मोरे उपस्थित होते. शिक्षण अधिकारी लोहार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिक्षण अधिकारी लोहार यांनी बी.के.स्कुल मधील नवीन वैशिष्ठे टॅबलेट स्कुल, डिजिटल AV क्लासरूम स्पिकोपेन याचे कौतुक केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे विविध कलागुण सादर केले. या कार्यक्रमास नवी दिल्ली येथील बचपनचे कार्पोरेट ऑफिसचे वेरागी उपस्थित होते. वेरागी यांनी संस्थेतील शिक्षणातील टॅबलेट, AR, VR या सर्व टेक्नॉलॉजीची माहिती कार्यक्रमास आलेल्या पालक वर्गांना दिली. तसेच आतंरराष्ट्रीय पातळीवर खेळामध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी कोडोली गावचे सरपंच नितीन कापरे, ग्राम पंचायत सदस्य माणिक मोरे, बी.के.अकॅडमीचे संस्थापक भरत कडवेकर, मुख्याध्यापीका वर्षा डोईजड, संचालक दिलीप पाटील, अमर पाटील तसेच शिक्षक स्टाफ व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता