सामाजिक

शिवजयंती ला घरावर ‘ भगवा ‘ फडकवा-अनिल तळप शाहीर

बांबवडे : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या १९ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. हि जयंती सर्वच तरुण मंडळांनी, शिवभक्तांनी सणासारखी साजरी करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अनिल तळप व मित्रवर्गाचे शाहीर यांनी केले आहे.
या शिवजयंती ला प्रत्येकाने आपल्या घरावर गुढ्या उभारून ‘ भगवा ‘ फडकवावा. ज्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे स्मरण होईल. इतर धांगड धिंगा न करता सौहार्दाचे वातावरण ठेवून, आपल्या राजांना खऱ्या अर्थाने अभिवादन करावे, असे आवाहन हि अनिल तळप यांनी केले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!