भाई शंकर पाटील आप्पा स्मृतीदिन उत्साहात संपन्न
कोडोली प्रतिनिधी : कोडोली ता.पन्हाळा येथील कोडोली हायस्कुल येथे भाई शंकर तुकाराम पाटील (आप्पा)यांचा आज २७ वी स्मृतीदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी या सोहळ्याचे उदघाटन प्रमुख पाहुणे क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.राजा माळगी यांच्या हस्ते भाई शंकर पाटील आप्पा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा मध्यवर्ती चिटणीस भाई भारत पाटील हे होते. आज स्मृती दिन सोहळ्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कोडोली हायस्कुल येथे सकाळी ८ वाजता सदभावना दौड घेण्यात आली.यावेळी कोडोली शिक्षण संघाचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांनी भाई श.तू.पाटील आप्पा यांची प्रतिमा पूजन केले. तसेच सदभावना दौडची सुरवात शिक्षण संघाचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले होते.या सदभावना दौड मध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच शालेय क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनीना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले.जिल्हास्तर,राज्यस्थरावरील विविध स्पर्धामध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे प्रा.माळगी यांच्या व शिक्षण संघाचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी या स्मृती सोहळ्यास कोल्हापूर जिल्हा माजी उपमहापौर प्रकाश पाटील,वारणा साखर करखानाचे संचालक प्रमोद कोरे,कोडोली हायस्कुलच्या प्राचार्या श्वेता गोडबोले,डॉ.विजय मुळीक,उधोजक कृष्णन परमेश्वरनं,डॉ.डोईजड,डॉ.संपत पाटील,अंजिक्य पाटील,शिक्षक,कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.