आंबवडे गावच्या उपसरपंच पदी ‘ भाऊसाहेब मोहिते ‘
पैजारवाडी प्रतिनिधी :- कृष्णात हिरवे
आदर्श गाव आंबवडे (ता.पन्हाळा) येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी राजर्षी शाहू-फुले-आंबडेकर आघाडीचे भाऊसाहेब यशवंत मोहिते यांची बिनविरोध निवड झाली आहे .येथील ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक पार पडली असून, थेट जनतेतून सरपंच पदी अरुण सखाराम जगदाळे यांची निवड झाली आहे. या उपसरपंच निवड सभेसाठी नवनिर्वाचित सदस्य कुमार जगदाळे, रांजेद्र जाधव, बजरंग कांबळे, गितांजली पोवार, अनिता गुरव, सुजाता पाटील., पार्वती मोरे, शकुंतला जगदाळे उपस्थित होते.
भाऊसाहेब यशवंत मोहिते यांचा उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने, सभाध्यक्ष सरपंच अरुण जगदाळे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केली. निवडी नंतर ग्रामसेवक अश्विनी कांबळे यांनी उपसरपंच भाऊसाहेब मोहिते यांचा सत्कार केला. यावेळी विकास पाटील, धनाजी गुरव, दिनकर कांबळे, शंकर जगदाळे, पोलीस पाटील महादेव कांबळे, संभाजी कांबळे, तातोबा जगदाळे, शहाजी जगदाळे, राजेंद्र सुर्वे, रवि कांबळे, संजय जगदाळे उपस्थित होते.