पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथे भूस्खलन…
पन्हाळा प्रतिनिधी :
पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर येथील शिवा काशिद स्मारका नजिक डोंगर भागात उत्खनन केल्याने दरड कोसळून भूस्खलनाची घटना घडली आहे. येथील न्यू महाराष्ट्र विद्यामंदिर परिसरात गट नंबर(१०२)मध्ये नुकतेच डोंगर पोखरून सपाटीकरण करून, कुंभार तळी मुजवल्याने हा प्रकार घडला असल्याचा अंदाज, येथील नागरिक वर्तवत आहेत.
‘ ये रे माझ्या मागल्या आणि ताक कन्या चांगल्या ‘ अशी अवस्था प्रशासनाची झालीय. २००५ च्या अतिवृष्टी दरम्यान गाव शेजारील तळ्यातील गाळ काढताना, अचानक जमीन सरकून परीसरातील अनेक घरे जमिनीने पोटात घेतली. अनेक कुटुंबांचा निवारा हरपला. काहींना तर समाज मंदिरात आश्रय घ्यावा लागला. ही घटना याच परिसरातील असून, या घटनेपासून बोध घेत शासनानं या परिसरात उखननाला बंदी केली पाहिजे होती, किंवा योग्य त्या परवान्यांनंतर म्हणजेच भूगर्भ विभागाच्या अहवाल नंतरच उलखनना ला परवानगी दयायला पाहिजे होती. पण तसे न करता या परिसरात गट नं. 102 मध्ये सपाटीकरणाचे काम केल्यानं, आणि दरम्यानच्या काळात सलग 15 दिवस संततधार पाऊस झाल्याने, या परिसरात अंदाजित एक हजार फूट लांबी पर्यंत च्या भेगा पडल्या आहेत. कुंभार तळीच्यावरील भागात डोंगराच्या खालच्या बाजूला उत्खनन केल्याने, पोखरलेल्या डोंगरातून दरड खचू लागली आहे. तसेच येथील न्यू महाराष्ट्र विद्यामंदिराच्या इमारतीला ही तडे गेले आहेत. या भागात पाऊसाचा जोर असाचा राहिला, तर डोंगरातून दरड कोसळून मोठे भूस्खलन होण्याची ही शक्यता इथल्या नागरिकांतून वर्तवण्यात येत आहे. जमीन खचण्याची ही घटना आज सकाळी न्यू महाराष्ट्र विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.सुजाता पोवार यांनी पन्हाळा तहसिल आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. शाळा चालू असतान कुंभार तळीच्यावरील डोंगरातून दरड भूस्खलनाचा मोठा आवाज होत, शाळेच्या भिंतीना भेगा गेल्याचे त्यांनी तहसील प्रशासनाला सांगितले.
पन्हाळ्याचे प्रांत अधिकारी अजय पवार, प्रभारी तहसिलदार अंनत गुरव व प्रभारी गट विकास अधिकारी शरद भोसले यांनी घटना स्थळी पहाणी केली आहे. तसेच घटना स्थळी खबदारीच्या उपाय योजना म्हणून आपत्ती व्यवस्थापन टिम कार्यरत आहे. एकूणच हा परिसर नेहमीच भूस्तरखलनामुळे गंभीर ठरला असून, या परिसरात उखननना पूर्वी भुगर्भ चाचणी घेऊन, पडताळणी करूनच उतखनन केलं पाहिजे. हे उत्खनन कोणाचे ,गट नं. 102 जमीन कोणाची या बाबत आणि घडलेला जमीन खचण्याची प्रकार या बाबत प्रभारी तहसीलदार अनंत गुरव यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.