देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी….
सुर्यालाही सहस्त्र किरणे, चंद्रालाही एक हजार,
देणारा तो,घेणारा तू, तुच कर तुझा विचार ,देणाऱ्याचे हात हजार…
आजही धकाधकीच्या जीवनात माणुसकी अजून जिवंत आहे. आजही माणूस दुसऱ्याचा विचार करतोय, हेही नसे थोडके.
शाहुवाडी तालुक्यातील सावे विद्यामंदिरात चौघा तरुण मंडळींनी शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या मोफत गणवेश वाटपातून, या मंडळींना कोणताही स्वार्थ साधायचा नव्हता. इच्छा फक्त एकच होती ,ती म्हणजे कधी काळी ज्या शाळेत मी शिकलो ,त्या शाळेच्या ऋणात राहून तेथील विद्यर्थ्यांना फुल ना फुलाची पाकळी परत करायची. याच उद्देशाने या चौघांनी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.
दातृत्वाचं हे देणं,दिलंय सर्वश्री संतोष भिंगले, राजाराम चव्हाण, कमलाकर डाकवे, अमर सूर्यवंशी यांनी.
गणवेश वाटपाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव नलवडे होते.
यावेळी श्री नलवडे म्हणाले कि ,विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी शिक्षकवृंदाने त्यांना पैलू पडण्याचे काम केले पाहिजे, तरच त्यांची उज्ज्वल भवितव्याकडे यशस्वी वाटचाल होईल.
यावेळी श्री नामदेवराव पाटील सावेकर म्हणाले कि, शाळेसाठी शक्य तेवढा निधी पुरविण्याचे काम आम्ही आजपर्यंत केले आहे.तरीसुद्धा अजूनही शाळेला निधी ची आवश्यकता आहे.कारण इथंच देशाचं उज्ज्वल भवितव्य घडत आहे.तेंव्हा सर्वप्रथम शाळा हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून वाटचाल केल्यास देशाचं भविष्य घडेल.
यावेळी संजय साठे म्हणाले कि,थोड्याफार फरकाने सर्वच जण पैसे कमावतात,पण दातृत्वाची दानत मात्र रक्तातच असावी लागते.
यावेळी शाळेची माहिती पदवीधर अध्यापक भगवान पाटील सर ,यांनी आपल्या मनोगतातून दिली.
यावेळी सौ.जनाताई पाटील, सीताराम पाटील, हिंदुराव साठे, संजय साठे, टी.डी.पाटील सर, टी.पी.पाटील, रंगराव साठे, जगन्नाथ नलवडे, इंदुताई पाटील, बाजीराव सूर्यवंशी, सुरेश बहाद्दुरे, मुख्याध्यापक रामदास चव्हाण,विकास पाटील, संतोष पाटील, सरस्वती डाकवे, रामचंद्र पाटील, सुवर्णा बहाद्दुरे, व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्य्क्रमचे आभार विकास हजारे यांनी मानले.