सामाजिक

आजवर केले धर्मासाठी, आता करा देशासाठी…

काश्मीर मधील आतंकवाद जर कायम स्वरूपी रोखायचा असेल, तर संपूर्ण देशाने सर्वप्रथम काश्मीर पर्यटन थांबवायला हवे. कारण या गुलाबी राज्याने वाळवीसारखे या देशाला पोखरले असून, इथल्या गुलाबी रंगाऐवजी रक्तवर्णीय रंगाची लोकांना सवय होवू लागली आहे. जे सैनिक आपल्या देशाची प्राणाचे बलिदान देवून संरक्षण करतात, त्यांनाच संपवण्याचा कुटील डाव हे फुटीरवादी काश्मिरी करत आहेत. येथील सगळीच जनता तशी नाही,पण काही जणांमुळे अवघे काश्मीर बदनाम होत आहे. यासाठी काश्मीर मधील जनतेनेच पुढे यायला हवे. कारण काही जणांमुळे हे घडत असेल, तर यावर उपाय त्यांनीच काढायला हवा. असे जर नाही घडले, तर यावर संपूर्ण देशाने मिळून विचार करायला हवा. आणखी किती जवानांचे बलिदान आपण, आपल्या डोळ्याने पाहणार आहोत. यासाठी संपूर्ण देशाने काश्मीर पर्यटन थांबवायला हवे,कारण येथील जनतेची आर्थिक नाडी पर्यटनावर आधारित आहे. पर्यटनामधून मिळणारा पैसाच इथल्या जनतेला सुबत्ता प्राप्त करून देत आहे. यांचे आर्थिकमान थांबवले, तर आपोआपच यांची कारस्थाने थांबतील.
हि सुबत्ता जर चांगल्या कामासाठी किंवा त्यांच्या स्वतःच्या उन्नतीसाठी असेल, तर आमचे काही म्हणणे नाही. परंतु हाच पैसा वापरला जातो ,तो आमच्याच BSF,SRPF,IAS,IPS दलांवर हमले करण्यासाठी. आमच्याच सैनिकांवर गोळीबार करण्यासाठी, आमच्याच सैनिकांवर हँड ग्रेनेड टाकण्यासाठी, आमच्याच जवानांवर पथ्थरबाजी करण्यासाठी. त्यांना हा पैसा आपण केलेल्या पर्यटनामधून उपलब्ध होतो. आपण जातो गुलाबी थंडी अनुभवायला,आणि अनुभवतो काय तर आमच्याच सैनिकांची रक्तरंजित बलिदाने. इथे, शेजारीच असलेल्या पाकिस्तान मुळे नेहमीच अशांतता असते. इथल्या जनतेला स्वायत्तता आणि अनुशासन यातील फरक कितपत पटतो, हे माहित नाही. परंतु इथे पथ्थरबाजी करणारा जवान काही आयात केलेला नसतो, तो इथलाच असतो. परंतु आपल्याच देशाविरोधात आपण उभे आहोत, हे सांगण्याचे सौजन्य इथली जनता जर दाखवू शकत नसेल, तर मात्र इथल्या जनतेचा मुलाहिजा बाळगायची काहीच गरज नाही. कारण इथला सैनिक मग तो बिएसएफ असो, कि राज्य राखीव दलाचा असो, तो कर्तव्य देशासाठी निभावत असतो. अशावेळी अशा जवानांच्या पाठीशी अवघा भारत उभा राहिला पाहिजे. देशविघातक प्रवृत्ती मोडून काढली पाहिजे.
यासाठी देव, धर्म बाजूला ठेवून देशासाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. यासाठी काश्मीर पर्यटन थांबवले पाहिजे. कारण यातूनच त्यांना पैसा उपलब्ध होतो. त्यांची हि आर्थिक नाडीच जर आपण सामान्य जनतेने कापून टाकली, तर यांना जगण्यासाठी सुद्धा पैसे उपलब्ध होणार नाहीत. आणि ज्यांचे हात अशा दुष्कृत्यामध्ये अडकले आहेत, त्यांचे हात रोजी रोटी कमवण्यात गुंततील. आपल्या सैनिकांवरचे हल्ले थांबतील. आजवर केले धर्मासाठी आता करा देशासाठी..

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!