देवाळे हायस्कुल देवाळे (ता.पन्हाळा) येथे अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न
पैजारवाडी प्रतिनिधी :- कृष्णात हिरवे
देवाळे हायस्कुल देवाळे (ता.पन्हाळा) येथे अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित केला होता.
या विज्ञान मेळाव्याचे उदघाटन देवाळे गावच्या सरपंच सौ.सारिका मांगलेकर यांच्या हस्ते झाले. या उदघाटन प्रसंगी उपसरपंच राजाराम विभूते, सर्व ग्रा.पं.सदस्य आणि पैजारवाडी, जेऊर, नावली, देवाळे, वेखंडवडी, बादेवडी,येथील शाळेचे विद्यार्थी व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटाचे ४५ उपकरणे व माध्यमिक गटाची २२ उपकरणे मांडण्यात आली होती. सदर विज्ञान प्रदर्शनास परिसरातील शाळेनी भेटी दिल्या. तसेच डायट चे प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी यांनी प्रदर्शनाला विशेष भेट देऊन बाल वैज्ञानिकांचे कौतुक केले.
शेवटी या विज्ञान प्रदर्शनाच्या सांगता समारंभ कार्यक्रमास जि. प.सदस्य शिवाजीराव मोरे , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी नवंनवीन वौज्ञानिक शोध लावून, भारत महासत्ता होण्यासाठी आपल्या मधून जास्तीजास्त विचारवंत, आणि मोठे शस्त्रज्ञ निर्माण होण्याची गरज आहे, असे सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
या प्रदर्शनातील ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यांना मा.मोरे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
या विज्ञान मेळाव्याचे नियोजन विज्ञान विभागाचे शिक्षिका सौ.गोसावी एच.एच,कुंभार, डी.एम,सौ.मुसळे, एम.व्ही,सौ.तळेकर व्ही.वाय, कु.गराडे एन.आर,मोहिते एन.आर,गराडे के.जे, यांनी केले.
तसेच हायस्कुलचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी याच्या सहकार्याने मुख्याध्यापक भोसले, जी.डी.व पर्यवेक्षक पाटील एम.एस यांच्या मार्गदर्शना खाली सदरचे निज्ञान प्रदर्शन यशस्वी पार पडले.