देवाळे विद्यालय व ज्युनिय कॉलेजचा समर्थ फौंडेशन तर्फे गौरव
पैजारवाडी प्रतिनिधी :-
देवाळे विद्यालय व ज्युनिय कॉलेजचा समर्थ फाऊंडेशन कडून मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
देवाळे विद्यालय व ज्युनियर कॉलेज देवाळे, च्या दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी व विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागलेबद्दल देवाळे ग्रामस्थ व समर्थ फौंडेशन च्यावतीने विद्यालयाला मानपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साही वातावरणात संपन्न झाला. हा गौरव डी.वाय.एस.पी.कृष्णात पिंगळे, कोडोली पोलीस ठाण्याचे स.पो.नि.संजयकुमार झाडे, वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला, तर प्रीन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक प्रा. विनय पाटील यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.
यावेळी समर्थ फौंडेशनचे अध्यक्ष सुहास पाटील, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाटील, सरपंच सौ. सारिका मांगलेकर, माजी सरपंच शिवाजीराव पाटील, पोलीस पाटील दिलीप मदने, सदस्या सौ. कल्याणी ढेरे, डॉ.भगवान वाळके, डॉ.सचिन मांगलेकर, चंद़कांत गराडे, संदीप पाटील, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक़माचे सूत्रसंचालन,उमेश सुतार, समीर घोरपडे यांनी केले. सुरुवातीस मुख्या.जी.डी.भोसले यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या सत्कार मनोगतात, त्यांनी देवाळे ग्रामस्थ व समर्थ फौंडेशन चे आभार मानले. प्रास्ताविक श्री. सुहास पाटील,तर आभार एस. ए. व्हरकट सर यांनी केले.