विनापरवाना डिजिटल बॅनर लावणाऱ्यांवर शिराळ्यात कारवाई
शिराळा प्रतिनिधी : शिराळा नगरपंचायतीमार्फत शिराळा शहरातीलअनाधिकृत डिजीटल बॅनरवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याने, अनधिकृत डिजिटल लावणाऱ्यांना धडकी भरली आहे.
शिराळा शहरात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अशोक कुंभार यांच्या आदेशाने शहरातील विनापरवाना अनाधिकृत डिजीटल बॅनरवर कारवाई करणेत आली. सदरची मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी शिराळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांचे विशेष सहकार्य लाभले. हि कारवाई शिराळा नगरपंचायतीचे अधिक्षक गणपती इंगवले यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली.
यामध्ये शिराळा शहरात विनापरवाना लावलेले वाढदिवस, अभिनंदन, राजकिय पक्ष इ.याबाबतची सर्व डिजीटल बॅनर यांचा समावेश होता.
मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी शहरात कोणतेही बॅनर लावताना, नगरपंचायतीची पूर्वपरवानगी घ्यावी. विनापरवाना अनाधिकृत डिजीटल बॅनर लावलेस, तसेच परवानगी संपलेले डिजीटल तात्काळ संबंधितांनी काढून न घेतलेस, प्रति डिजिटल बॅनर 500 रुपये दंडात्मक कारवाई करणेत येईल, व डिजीटल जप्त करुन संबंधितावर फौजदारी गुन्हा नोंद करणेत येईल असे सांगितले. शहरात नागरिकांनी अनाधिकृत डिजीटल लावलेचे आढळलेस, त्यांनी नगर पंचायतीशी संपर्क साधावा. त्याबाबत माहिती दिलेस संबंधितावर कारवाई करणेत येईल, असे आवाहन कुंभार यांनी केले आहे.