मुलींविषयी मानसिकता बदलणं गरजेचं -डॉ. जयश्री पाटील
मलकापूर प्रतिनिधी :
आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्व आणि यशानं स्त्रिया ही पुरुषांच्या बरोबरीन आपले नेत्तृत्व सिध्द करत असतानाही, मुलगा मुलगी भेदभाव करून, मुलीच्या जन्माविषयीची आपली मानसिकता बदलणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन डॉ. जयश्री पाटील यांनी मलकापूर येथे केले. .
मलकापूर तालुका शाहुवाडी येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीन सुरू असलेल्या कै. शैलजादेवी पंत प्रतिनिधी व्याख्यान मालेचं पहिलं पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. प्रारंभी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सर्जेराव पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, व्याख्यान मालेचं उदघाटन करण्यात आलं. यावेळी नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.जयश्री पाटील म्हणाल्या कि, जर स्त्रियाच संपल्या, तर संपूर्ण जीवनच संपले जाणार आहे. आपण भेदभाव न मानता, मुलगा मुलगी दोघांनाही समान शिक्षण दिलं पाहीजे. स्त्री देखील एक माणूसच आहे. आपले विचार आपण सकारात्मक ठेवून, आपली वाटचाल ठेवली पाहीजे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचं आपण स्वागत केल पाहीजे. स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली पाहीजे, आणि स्त्रिया विषयी असलेली आपली नकारात्मक विचारधारा बदलली पाहीजे .
पोलिस निरिक्षक अनिल गाडे म्हणाले कि, वाचनालयाचे माध्यमातून व्याख्यान मालेच्या रूपानं प्रेरणा दायी उपक्रम राबवला जात आहे. अनेक नवीन विचार आपल्याला ऐकण्यास मिळत आहेत.
नगराध्यक्ष अमोल केसरकर म्हणाले कि, वाचनालयाने सुरू ठेवलेली व्याख्यान माला ही सर्वानाच अनमोल अशी मार्गदर्शक ठरत आहे. नगरपरिषद व मलकापूर अर्बन च्या माध्यमातून आम्ही व्याख्यान मालेस सहकार्य करू
वाचनालयाचे अध्यक्ष रमेश पडवळ यांनी वाचनालयाच्या एकुण वाटचालीचा आढावा घेतला.
.या प्रसंगी नगरसेवक भारत गांधी, सुहास पाटील, नगरसेविका माया पाटील, संगीता पाटील, शालन सोनावळे, माजी उपनगराध्यक्ष रमेश चांदणे, वाचनालयाचे अध्यक्ष रमेश पडवळ, उपाध्यक्ष जितेद्रं वळीवडेकर, संचालक, सागर पाटील, महेंद्र मोरे ,सुनिल शिंदे, चारूदत्त पोतदार, दस्तगिर अत्तार, पुजा गांधी, अंजली फडणीस, यांच्या सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथपाल अमर खटावकर यांनी आभार मानले .