भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोडोलीत उत्साहात संपन्न
कोडोली वार्ताहर :
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १२७ वी जयंती, आज कोडोली ता.पन्हाळा गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.आणि विशेष म्हणजे पन्हाळा तालुक्यातील आंबेडकर विचारांना मानणारी बहुसंख्य जनता असणाऱ्या या गावात, आज ही जयंती डिजिटल फलक मुक्त अशी जयंती साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२७ वी जयंती,कोडोली परिसरामध्ये हा एक मोठा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव शांततेत पार पडावा म्हणून, पोलीस प्रशासनाच्या वतीने काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात एक शांतता बैठक घेण्यात आली होती. या बैठकी दरम्यान काही दलित बांधवांनी या वेळची डॉ. बाबासाहेब आंबेडरकरांची ही जयंती कोडोली गावामध्ये डिजिटल फलक मुक्त करणार असल्याचे सांगितलं होतं. त्यानुसार आज ही जयंती कोडोली मध्ये डिजिटल फलक मुक्त जयंती साजरी करण्यात आली. कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे सरपंच नितीन कापरे आणि कोडोली विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच समाज मंदिरामध्ये पन्हाळा शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर आर पाटील, तहसीलदार रामचंद्र चोबे आणि कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
या वेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन ही केले. यावेळी संयुक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीचे अध्यक्ष दीपक गायकवाड व सदस्य उपस्थित होते.