दुध आंदोलन हे शेतकऱ्याच्या भल्यासाठीच – श्री.अवधूत जानकर
बांबवडे : दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाचे संकलन डेअरी मध्ये न करता आपल्या घरीच वापरावे, तसेच त्या दुधाचे दुग्धजन्य पदार्थ बनवून घरात खावे. तसेच देवदेवतांना दुग्धाभिषेक करावा, परंतु दुध डेअरी मध्ये घालू नये. उद्या दि.१६ जुलै पासून दुध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात आपल्याच दुध उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होवू नये.यासाठी शेतकरी आणि दुध उत्पादक वर्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विनम्र आवाहन करण्यात येत आहे,असे युवा आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष अवधूत जानकर आणि कार्यकर्ते यांच्यावतीने सांगण्यात आले.
दुधाला ५ रुपये अनुदान मिळावे, आणि ते थेट दुध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे यासाठी या दुध रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्याचे आर्थिक मन वाढविण्यासाठी शासनाने दुग्ध भोक्तीला मिळणारे अनुदान जर शेतकऱ्याला दिले तर त्यांचे आर्थिकमान उंचावण्यास मदत होणार आहे.या उद्दात हेतूने आंदोलनाचे नियोजन केलेले आहे. म्हणून शेतकऱ्यांची अडवणूक होते, अशी अफवा पसरवली जाते,ती चुकीची आहे, हे आंदोलन नियोजन शेतकऱ्याच्या भल्यासाठीच केलेलं आहे , असे अवधूत जानकर व शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी शाहुवाडी तालुकाचे अध्यक्ष जयसिंग पाटील,शाहुवाडी तालुका उपाध्यक्ष अमर पाटील , शाहुवाडी तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष पद्मसिंह पाटील ,विद्यार्थी परिषद तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, ग्रा.स.सतीश पाटील , शिवाजी पाटील,सावे, अनिल पाटील , डोणोली,भाडळे शाखा प्रमुख अक्षय पाटील उत्तम पाटील, दत्तात्रय जानकर , योगेश बेंद्रे यासंह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.