सामाजिक

भिडे गुरुजींच्या व्याख्यानाबाबत पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन सादर

बांबवडे : बांबवडे येथील भिडे गुरुजींच्या व्याख्यानाबाबत काही संघटनांनी केलेल्या विरोधाबाबत शिवजयंती उत्सव कमिटी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, सचिन मुडशिंगकर, शरद सुतार, ग्रामपंचायत सदस्य अभयसिंह चौगुले आदी मान्यवर व ग्रामस्थ आदींनी याबाबत पोलीस उपाधीक्षक श्री .आर.आर.पाटील यांना निवेदन दिले आहे.
या घटनेसंदर्भात गावात शांतता व सुव्यवस्थेला बाधा येवू नये, यासंदर्भात पोलीस खात्याने खबरदारी घ्यावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले असून, उद्या दि.२३ फेब्रुवारी च्या अनुषंगाने भिडे गुरुजींचे व्याख्यान व्यवस्थितरीत्या होईल. असा आशावाद ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!