कोडोलीत श्री गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव
कोडोली प्रतिनिधी :
शेगाव येथील संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त कोडोली ता. पन्हाळा येथील श्री कोटेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन शनिवार दिनांक २६ रोजी सकाळी करण्यात आले आहे.
श्री कोटेश्वर मंदिरात सकाळी श्रींच्या मूर्तींस अभिषेक ‘ गजानन विजय ‘ ग्रंथाचे सकाळी ११ वाजता सामुदायिक पारायण करण्यात येणार आहे. ज्या भाविकांना पारायणास बसायचे आहे, त्यांनी स्वतःचा ग्रंथ घेऊन यावा. ज्यांच्याकडे ‘ श्री गजानन विजय ग्रंथ ‘ उपलब्ध नाही, अशा भाविकांसाठी पारायणास ग्रंथ उपलब्ध आहेत. पारायण नंतर सामुदायिक महाआरती सकाऴी १२ वाजता होईल. यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राम पाटील यानी केले आहे.