बांबवडे मधील गणेशनगर येथील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण चा शुभारंभ
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील गणेशनगर मधील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ येथील उद्योगपती तानाजीराव चौगुले यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
बांबवडे इथं आमदार सत्यजित पाटील यांच्या फंडातील १५ लाख रुपये खर्चाची कामे धरली गेली होती. त्यापैकी गणेशनगर येथे १२० मीटर रस्त्याचे काम मंजूर केले होते. १५ लाख रुपये खर्चाची इतर कामे संपन्न झाली असून, केवळ गणेशनगर येथील काम शिल्लक होते. त्या कामाचा प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने शुभारंभ झाला आहे. हे काम तानाजीराव चौगुले यांच्या प्रयत्नातून झाले आहे.
यावेळी येथील सुरेश नारकर, गजानन निकम, सचिन मूडशिंगकर, अभयसिंह चौगुले ,स्वप्नील घोडे-पाटील, टी.पी.पाटील, बाळासाहेब रवंदे, सर्जेराव पाटील, शेवाळे सर, महादेव मूडशिंगकर, पंडित निकम, महादेव तळसकर, विशाल साठे, सुदाम साठे, वैभव नारकर, संग्राम चौगुले, योगेश निकम, विलास निकम, अमर निकम, महादेव निकम, उमेश चव्हाण, दीपक पाटील, दाजी,व इतर गणेशनगर मधील ग्रामस्थ उपस्थित होते.