शिराळा तालुक्यात गव्यांचे दर्शन
शिराळा: पणुंब्रे तर्फ शिराळा (ता. शिराळा) व जिंती( ता . कऱ्हाड) या सांगली , व सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील या गावांच्या डोंगरावर आज ७ जंगली गव्यांचा कळप शेतकऱ्यांना आढळून आला असल्याने, परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबतची समजलेली माहिती अशी कि, गव्यांचा कळप असल्याचे दोन्ही गावातील नागरिकांना समजताच पणुंब्रे, गिरजवडे, जिंती, बोत्रेवाडी, शेवाळेवाडी या गावामधील ग्रामस्थ व युवकांनी डोंगराकडे धाव घेतली. पीराचा डोंगर हा सांगली व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर आहे . आज सकाळी गव्याची माहीती जिंती ता . कऱ्हाड येथील लोकांना समजताच, त्या परिसरातील शेतकरी युवकांनी गवे सांगली जिल्ह्याच्या बाजुला डोंगराकडे पिटाळले आहेत. गव्यांच्या या कळपामुळे लोकांच्यात घबराटीचे वातावरण आहे . हे गवे चांदोली अभयारण्यामधुन आले असावेत, अशी चर्चा आहे .