लुबाडणूक करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवा – श्री.एन.ए. कुलकर्णी
बांबवडे : ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. त्याची लुबाडणूक करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवा. असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे विभागीय सदस्य एन.ए. कुलकर्णी यांनी केले.
श्री शिवशाहू महाविद्यालय सरूड तालुका शाहुवाडी येथे २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन ग्राहक प्रबोधन निमित्ताने ते बोलत होते. यावेळी प्राचार्य बी.आर. गाडवे अध्यक्षस्थानी होते. स्वागत प्रा.एल. टी.आरगे यांनी तर तालुका अध्यक्ष जगन्नाथ जोशी यांनी प्रास्ताविक केले.
श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले कि,आपल्याला संवादातून व्यवस्थेला सुधारायचे आहे. हिंसाचार दूर ठेवून राष्ट्रीय हित जोपासायचे आहे. यासाठी चिकीस्तक ग्राहक दृष्टी आत्मसात करा,व चौकस रहा.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका सचिव रामचंद्र सातपुते ,सचिव उदय पाटील ,दत्तात्रय नलगे ,विध्यार्थी उपस्थित होते.सुत्रासंचालन समर्था हंडे यांनी केले. तर आभार अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे बांबवडे शहर अध्यक्ष अमर पाटील यांनी मानले .