‘ ओम कृष्ण विजय केएसके पेट्रोलपंप ‘ व ‘ इंडियन ऑईल कंपनी ‘ ची गुढीपाडवा धमाका सोडत संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ओम कृष्ण विजय केएसके पेट्रोलपंप व इंडियन ऑईल कंपनीच्या वतीने ठेवण्यात आलेल्या ‘ गुढीपाडवा धमाका ‘ ची सोडत आज इथं आरोही पचकर, निखिला अभयसिंह चौगुले ह्या लहानग्या मुलींच्या हस्ते काढण्यात आली. या सोडतीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रिकनेक्ट कंपनीचे वॉशिंग मशीन संजय बाबुराव रोडे रहाणार पाटणे, तालुका शाहुवाडी यांना मिळाले.
यामधील दुसरे बक्षीस रिकनेक्ट कंपनीचा ३२ इंची एलइडी टिव्ही विकास पाटील सोनवडे, तिसरे बक्षीस होम थिएटर मनीषा खोत सरूड, चौथे बक्षीस अमोल महापुरे ऐतवडे खुर्द, तर पाचवे बक्षीस पॉवर बँक चंद्रकांत कुंभार बांबवडे अशा भाग्यवंतांना मिळाले आहे.
सदरचा पेट्रोलपंप श्री बाळासाहेब चौगुले व अभयसिंह चौगुले यांच्या मालकीचा आहे. जानेवारी २०१८ पासून या पेट्रोल पंपावर पाचशे रुपयांच्यावर पेट्रोल किंवा डीझेल भरल्यानंतर कुपन दिले जाते. या सर्व कुपन्स एका बंद पेटीत ठेवण्यात आले होते. त्या कुपन्स ची आज मान्यवरांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र बांबवडे शाखेचे उपप्रबंधक परमिंदरसिंग ,बांबवडे गावचे माजी सरपंच जयसिंगराव घोडे-पाटील , गजानन निकम, विद्यमान बांबवडे ग्रामपंचायत सदस्य सुरेश नारकर, निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश पचकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हि सोडत काढण्यात आली.
यावेळी ग्रामस्थ दीपक साडविलकर, महादेव मुडशिंगकर, सुनील वाणी, शामराव कांबळे, विठ्ठल पोवार, सचिन मूडशिंगकर व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. विक्रम बांबवडेकर यांनी केले.