खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीड पटीने वाढ : कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा
दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांचा हमीभाव दीड पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्याला पिकाच्या हमीभावात क्विंटल मागे तब्बल २०० रुपयांनी वाढ मिळणार आहे. यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खरीप पिकांच्या हमीभावात दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच इतकी मोठी वाढ करण्यात आली आहे. या आधी २००८-०९ मध्ये यूपीए सरकारनं १५५ रुपयांची वाढ केली होती.
त्याशिवाय १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे. या पिकांचा हमीभाव ९०० रुपयांवरून थेट २,७०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. त्यामुळं सरकारच्या तिजोरीवर ३३,५०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. विशेष म्हणजे, वाढीव हमीभावाचे मूल्य जीडीपीच्या ०.२ टक्के आहे. तर, अतिरिक्त खर्चात पिकासाठी १२,३०० कोटी रुपये खर्च होणार आहे.