डोक्यात नारळ पडून हराळे यांचा मृत्यू
शिराळा : येथील अरुण नामदेव हराळे ( वय ४९ ) यांचे डोक्यात झाडावरील नारळ पडलेने त्यांच्या मृत्यू झाला.
याबाबत भास्कर हराळे यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. घटना सोमवार दि.११ डिसेंबर२०१७ रोजी सकाळी ८:३० वाजण्या पूर्वी घडली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मयत हराळे हे चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना येथील संस्थेत नोकरीस होते. सकाळी आपली मोटोरसायकल लावून चालत जात असता, त्यांचे डोक्यात नारळ पडला. यामुळे ते बेशुद्ध झाले . त्याना तातडीने शिराळा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार बी.एम.घुले करत आहेत.