चलो कोल्हापूर ,हिंदुत्व सन्मान मोर्चासाठी – शिवप्रतिष्ठाण,बांबवडे तर्फे आवाहन
बांबवडे : शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान चे संस्थापक मा.संभाजी भिडे गुरुजी यांना खोट्या गुन्ह्यात अडकवाल्याच्या निषेधार्त तसेच बदनामी च्या निषेधार्त बुधवार दि.२८ मार्च २०१८ रोजी सकाळी ११ वाजता बिंदू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय , कोल्हापूर येथे हिंदुत्व सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान,बांबवडे चे अध्यक्ष श्री.शरद सुतार यांनी सांगितले.
हिंदुच्या सन्मानासाठी तसेच ३ जानेवारी २०१८ रोजी बंद च्या नावाखाली झालेल्या तोडफोडीच्या नुकसान भरपाई साठी याच बरोबर दंगलीला कारणीभूत असणाऱ्या नेत्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. हा मोर्चा अठरापगड जातींचा मिळून असणार आहे. हा कोणत्याही जातीविरुद्ध किंवा धर्माविरुद्ध नसेल,हा मोर्चा हिंदुच्या सन्मानासाठी आहे.हा मोर्चा हिंदुत्व विरोधी शक्तीविरुद्ध आहे. भावी पिढीच्या भवितव्यासाठी प्रत्येक हिंदूने सहकुटुंब या हिंदुत्व सन्मान मोर्चासाठी मोठ्या संख्येने बिंदू चौक,कोल्हापूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान,बांबवडे चे अध्यक्ष श्री.शरद सुतार यांनी केले आहे.