सावे इथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न
बांबवडे : सावे ता.शाहुवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ.जनाताई नामदेवराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्री.बाबुराव नलवडे,श्री.भीमराव नलवडे , श्री.संभाजी कांबळे,श्री.जगन्नाथ नलवडे , श्री.भीमराव शिंदे , श्री.गुंगा कांबळे व ग्रामस्थ उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संजय नलवडे यांनी केले तर आभार श्री.मधुकर नलवडे यांनी मानले.