कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ : अर्ज भरण्याची मुदत १ मे पर्यंत
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत १ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय ‘वन टाईम सेटलमेंट’ मुदतीतही शासनाने ३० जून पर्यंत वाढ केली आहे.
यापूर्वी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ह भरण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती.पण आता हि मुदत १ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुदतवाढी चा निर्णय घेतला आहे.