कॅरम खेळताना न्यू इंग्लिश स्कुल शिराळा चे विध्यार्थी
शिराळा प्रतिनिधी : मलकापूर (ता.शाहूवाडी ) येथे पार पडलेल्या कॅरम स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुल,शिराळा चे इयत्ता ९ अ चा साहिल बागल व संकल्प कांबळे यांनी चमकदार कामगिरी केली.
एकेरीत प्रथम क्रमांक साहिल बागल व तृत्तीय क्रमांक संकल्प कांबळेने मिळवला.
दुहेरीत- प्रथम क्रमांक साहिल बागल व संकल्प कांबळेने मिळवला.
त्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिवाजी भोसले, श्री. रवींद्र हसबनिस, क्रीडा शिक्षक आर .पी. पाटील, एम.एच. हाके, मोहसीन नदाफ यांचे मार्गदर्शन लाभले.