कर्नाटकातील अपघातात महाराष्ट्रातील सहा जण ठार तर दोन गंभीर
कोल्हापूर : कर्नाटकात कर्नाटक परिवहन ची बस व क्रुझर व्हॅन ची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी आहेत. मृत व्यक्ती सर्व महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील दारफळ गावचे रहिवाशी आहेत.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि क्रुझर व्हॅन मधील प्रवासी कारवार इथं कॅन्सर रोगावर इलाज करण्यासाठी गेले होते.
बागलकोट जिल्ह्यातील बिलागी तालुक्यात हा अपघात झाला. अपघातग्रस्त व्हॅन कारवारहून सोलापूरकडे येत होती. तर, बस विजयपुरा येथून बागलकोटकडे निघाली होती. कोरती गावाजवळ या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. धडक जोरदार असल्याने क्रुझर गाडी अर्ध्यापर्यंत कापत गेली.त्यामुळे गाडीतील सहा प्रवासी जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.