शिराळा तालुक्यातील खेड इथं पारायण संपन्न
शिराळा प्रतिनिधी : खेड (ता.शिराळा ) येथे पारायण सोहळा सुरु असून, त्यासाठी १२१ वाचक बसले आहेत.
महाशिवरात्री निमित्त व गुरूवर्य तात्यासाहेब वास्कर (आबा)यांच्या जन्म शताब्दी निमित्त १२१ वाचकांनी दीप प्रज्वलन केले. व्यासपीठ चालक म्हणून बबन महाराज, चोपदार-शिवाजी माळी, पखवाज वादक- सुनिल भाबुरे , पंढरीनाथ माळी काम पाहत असून, हरी कदम ,बाबा मस्कर ,आनंदा यादव, बाळू माळी, बाळासो पा माळी, कंदाहरी माळी, रघुनाथ माळी यांची कीर्तन साथ आहे.