कोडोली उपजिल्हा रुग्णालयाला टाळे ठोकणार : ‘ मनसे ‘ चा मोर्चाद्वारे इशारा
कोडोली प्रतिनिधी:-
कोडोली ता.पन्हाळा येथील उपजिल्हा रुग्णालयावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घोषणा देत, मोर्चा काढण्यात आला. कोडोली उपजिल्हा रुगणालय मध्ये कोडोली तसेच कोडोली गावाच्या आसपासच्या गावातील लोक उपचारासाठी येत असतात. यावेळी रुग्णालयात सर्व रोग निदान, तसेच स्त्रियांच्या गरोदर काळात अत्यावश्यक असणारी सोनिग्राफी यंत्र उपलब्ध नसल्याने गरोदर महिलांना तपासणी करिता खाजगी रुग्णालयात जावे लागते. तसेच अपघातातील रुग्ण उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय मध्ये येत असतात, पण रुग्णालय मध्ये अतिदक्षता विभाग नसल्याने, रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे,त्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. तर संबंधित विभागाने लवकर दखल घ्यावी, याबाबतचे निवेदन मनसेच्या वतीने कोडोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शेट्ये यांना देण्यात आले. याबाबत लवकर निर्णय न घेतल्यास मनसे स्टाईलने रुगणालायस टाळे ठोकून, ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा मनसेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे. यावेळी कोल्हापूर उपजिल्हा अध्यक्ष संतोष जाधव, विध्यार्थी सेना शहर अध्यक्ष संतोष पवार, तालुका अध्यक्ष सुरज निकम, शहर उपाध्यक्ष सत्यजित कुंभार, तसेच मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.