बोरपाडळे त संत गोरा कुंभार समाज मंडळाची स्थापना
पैजारवाडी : बोरपाडळे तालुका पन्हाळा येथील कुंभार समाजाच्या वतीने संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. एल.आय.सी. चे विस्तार अधिकारी विजय कुंभार यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन पन्हाळा-बावडा तालुका अध्यक्ष रामचंद्र कुंभार यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना अध्यक्ष रामचंद्र कुंभार यांनी पुरुषांबरोबर स्त्रियांनी सक्रीय होवून संघशक्ती च्या माध्यमातून विविध सामाजिक कामे व योजना यशस्वीपणे राबवता येतील,असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे युवा राज्य कार्याध्यक्ष विक्रम कुंभार यांनी समाजाच्या शासकीय योजनांची माहिती देत समाजातील युवकांनी या योजनांचा फायदा उठवत सामाजिक स्तर उंचावण्यास हातभार लावावा,असा सल्ला दिला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष भगवान कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास कोडोली पोलीस संदीप बोरकर, यशवंत बँक अधिकारी वसंत कुंभार, कु.मा.व.त. सोसायटी संचालक एम.व्ही. कुंभार, सरपंच शरद जाधव, भाजप चे ओबीसी तालुका अध्यक्ष संदीप कुंभार, व समस्त कुंभार समाज कार्यक्रमास उपस्थित होता.
प्रास्ताविक भगवान कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू कुंभार तर आभार सुरेश कुंभार यांनी मानले.