महादेव हवालदार यांना जीवनगौरव पुरस्कार
शिराळा प्रतिनिधी : बांबवडे (ता.शिराळा) येथील जि.प. शाळेचे शिक्षक श्री महादेव आनंदा हवालदार यांना औरंगाबाद येथील बोधी ट्री एज्युकेशन फाऊंडेशन व जीवन गौरव वाचनालय तर्फे मराठवाडा विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव प्रा.डॉ. देगावकर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हवालदार यांनी २१वर्षाच्या सेवाकार्यात क्रीडा स्पर्धा , पालक प्रबोधन, शालेय विविध उपक्रमाचे आयोजन, अभ्यास पूरक परिसर भेटी , सांस्कृतिक, शैक्षणिक स्पर्धेतील यश , लोकसहभागातून सांस्कृतिक कार्यक्रमातून शैक्षणिक उठाव, शालेय पट व उपस्थिती वाढविणे , झांज पथक निर्मिती, शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेतील यश, राज्य स्तरीय निबंध लेखन स्पर्धा, विविध सामाजिक कार्यात सहभाग या सारख्या उपक्रमातून शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सोमनाथ वाघमारे,रामदास वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.