‘ महाराष्ट्र बंद ‘ ला कोडोलीतून कडकडीत बंद पाळून प्रतिसाद
कोडोली वार्ताहर :
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक ३ जानेवारी रोजी ‘ महाराष्ट्र बंद ‘ ची हक्क दिली आहे. या बंदला कोडोली ता.पन्हाळा येथील दलित संघटनेच्या वतीने सर्व बाजारपेठ बंद ठेऊन पाठींबा देण्यात आला आहे.
आज सकाळी शिवाजी चौक येथे दलित संघटनेच्या वतीने छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून शिवाजी चौक ते कोडोली एम. एस. ई. बी. फाटा येथे पर्यंत घोषणा देत रॅली काढण्यात आली. यावेळी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करून, दुकान बंद ठेण्यास सांगण्यात आले. कोडोली पोलीस ठाण्याकडून यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता….