पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टीक पिशवी ऐवजी कागदी पिशवीचा वापर गरजेचा – शहर कोऑरडीनेटर मेघा स्वामी
मलकापूर प्रतिनिधी :
पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टीक पिशवी ऐवजी कागदी पिशवीचा वापर करणे, काळाची गरज असल्याचे, प्रतिपादन मलकापूर नगरपरिषदेच्या शहर कोऑरडीनेटर मेघा स्वामी यांनी मलकापूर येथे केले.
मलकापूर नगरपरिषदच्या वतीने मुख्याधिकारी अॅलीस पोरे ह्यांच्या मार्गदर्शना खाली कागदी पिशवी प्रशिक्षण कार्यशाळा, बचत गट शाळा व कॉलेज या ठिकाणी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी बांधकाम सभापती प्रवीण प्रभावळकर, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर पाटील यांची प्रमूख उपस्थिती होती.
या वेळी पुढे बोलताना मेघा स्वामी म्हणाल्या कि, दिवसेदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे . याला कुठेतरी रोखणे गरजेचे आहे. प्लास्टीक पिशवीचा वापरही अधिक प्रमाणात वाढला असून, त्याच्या वापरानंतर त्या इतरत्र टाकल्या जातात. त्यांचे विघटन न होता, त्या तशाच रहात असल्याने, त्याचा पर्यावरणावर परिणाम होत आहे. यासाठी आपण कागदी पेपर पासून पिशवी बनवून त्याचा वापर केला, तर ते अधिक महत्वपूर्ण आणि स्वच्छतेसाठी निर्णायक ठरणार आहे. पेपर पासून पिशवी कशा पध्दतीने बनवायची याचे प्रात्यक्षिकही या वेळी दाखवण्यात आले.
या वेळी नगरसेवक प्रविण प्रभावळकर, सुधाकर पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मलकापूर येथील शाळा व कॉलेज मध्ये जाऊन प्रशिक्षण दिले. सरासरी 5000 कागदी पिशव्या ह्या शिबिरात बनवण्यात आल्या, मलकापूर नागरपरिषद कर्मचारी प्रसाद हर्डीकर, राधिका हावळ, महेश गांवखडकर, रमेश चौगुले, चेतन शिंदे व सहकारी यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात सहभागी शाळा ग. रा. वारंगे कॉलेज(२४००) पिशव्या मलकापूर हायस्कुल(८००), न्यू इंग्लिश स्कुल फॉर गर्ल(७२०), ब्रिलीयन्ट स्कूल(९०) ,बचत गट (140) ह्या उपक्रमाकरिता विध्यार्थ्यांनि व महिलांनी आपल्या घरातून रद्दी पेपर आणले होते. मलकापूरात शहरात संपूर्ण प्लॅस्टिक पिशव्या बंदी असल्याच्या पार्शवभूमीवर कागदी पिशवी वापरण्याचे प्रबोधन म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी कॉलेज चे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .प्रा .पोपट कुंभार यांनी सुत्रसंचलन केले .