मनसेची तालुक्यातील नवीन कार्यकारीनी जाहीर
बांबवडे: महाराष्ट्र नवनिर्मान सेनेची शाहुवाडी तालुक्यातील नवीन कार्यकारीनी जाहीर झाली आहे. जिल्हा अध्यक्ष- गजाननराव जाधव व तालुका प्रमुख कृष्णात दिंडे यांच्या हस्ते तालुक्यातील कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. हा निवडीचा कार्यक्रम तालुका प्रमुख कृष्णात दिंडे यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी सौ.फरजाना अल्लाबक्ष मुल्ला यांची मनसेच्या कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. याचबरोबर
आनंदा शंकर विंगकर यांची शित्तूर वारुण जि .प. तालुका उपाध्यक्ष पदी,
कृष्णात बापू पाटील यांची पिशवी जि.प. मतदार संघ तालुका उपाध्यक्ष पदी,
मारुती राऊ खोत केर्ले यांची करंजफेण जि.प. मतदार संघ तालुका उपाध्यक्ष पदी, तसेच
सतिश शिवाजी तेली यांची बांबवडे शहर अध्यक्ष पदी, तर
विजय मारुती परीट यांची बांबवडे शहर उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
या सर्व नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनसे कार्यकर्त्यां मधून अभिनंदन होत आहे. यावेळी विभाग प्रमुख विकास महाडिक, जिल्हा उप प्रमुख संतोष जाधव ,तालुका उप प्रमुख नयन गायकवाड, सुनिल सुतार, महादेव मुल्ला, सतीश तांदळे , आनंदा विनकर, मारुती खोत , प्रथमेश पाटील,विजय निकम,मंगेश घोडके ,आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.