श्रमजीवी कर्मचारी युनियन च्या उपोषणाला माजी आम.मानसिंगराव नाईक (भाऊ )भेट
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तहसील कार्यालयाजवळ बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन शाखा शिराळा मार्फत ‘ आमच्या हाताला काम द्या ‘ या मागणीसाठी २२ नोव्हेंबर २०१७ पासून चक्री उपोषण सुरु आहे. त्या उपोषणाला माजी आमदार मानसिंगराव नाईक ( भाऊ ) यांनी भेट देवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठींबा दर्शविला.
यावेळी माजी सरपंच देवेंद्र पाटील, काँट्रॅक्टर प्रताप पाटील, नगरसेवक संजय हिरवडेकर, मोहन जिरंगे, विठ्ठल कदम, धनाजी चव्हाण, प्रमोद पवार, वासिम मोमीन, सोहेल मुल्ला, सुनील पवार, बांधकाम कामगार युनियन चे संस्थापक अहमद मुंडे, अशोक सावंत, हरिभाऊ कवठेकर, विवेक साळुंखे, पंडित पाटील, राजेंद्र माने, निकु मिस्त्री आदी उपस्थित होते.