महाराष्ट्र बंदला वारणा-कोंडोली बंद ठेऊन पाठिबा
पन्हाळा प्रतिनिधी :
मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद ची हाक मराठा मोर्च्यांच्या काही आंदोलकांनी दिली होती. पण पंढरपूर चे वारकरी अद्याप परतले नसल्यानं , हा बंद आज आचरणात आणू नये अशी भूमिका काही आंदोलकांकची होती. तरी पण वारणा कोडोली परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेऊन नागरिकांनी आजचा बंद यशस्वी केलाय. आज या परिसरात खाजगी प्रवासी वाहतूक आणि एस टी बस सेवा ही बंद करण्यात आली होती .