वाकुर्डे बुद्रुक मानेवाडी येथे मराठा वॉरीअर्स च्या वतीने स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांचे वाटप
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. घागरेवाडी येथील सुरज खोचरे याच्या अपघाती मृत्यूमुळे त्या परिसरात शिवजयंतीवर दुःखाचे सावट होते.
तालुक्यात इतरत्र डॉल्बीला फाटा देऊन, झांज पथक, लेझीम, ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढून, शिवजयंती साजरी करण्यात आली. पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे गावा गावात भव्य स्वागत करण्यात आले. मणदूर, सोनवडे, आरळा, काळुंद्रे, पनुंब्रे वारुण, चरण, ढाणकेवाडी, मोहरे, नाठवडे, शेडगेवाडी, कोकरूड, बिळाशी, मांगले, मांगरुळ, कांदे, चिखली, शिराळा, नाटोली, सागाव, वाकुर्डे, अंत्री, पाचुंब्री, बांबवडे, शिरशी, धामवडे, पाडळी, वाकुर्डे, भाटशिरगाव अशा महत्वाच्या गावासह वाडी वस्तीवर शिवजयंती शांततेत साजरी करण्यात आली.
वाकुर्डे बुद्रुक मानेवाडी येथील मराठा वॉरियर्स च्या वतीने शिवजयंती निमित्त स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाटप .करण्यात आले.