नाईक आडनावा व्यतिरिक्त शिराळ्याला आमदार द्या-मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत
शिराळा प्रतिनिधी : नाईक आडनावा व्यतीरीक्त शिराळा विधानसभेला आमदार देण्यासाठी एकत्र या, असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केले.
शिराळा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी सावंत पुढे म्हणाले कि, २० वर्षे नाईक घराण्याकडे जनतेने सत्ता दिली, पण त्यांनी वाकुर्डे बु. योजना सोडून कोणतेही ठोस काम केले नाही .यांचा फोडा फोडी व जीरवा जीरवीचं राजकारण करण्यात वेळ जातो. विद्यमान आमदारांची मंत्रीपदाच्या मागे लागण्यात ४ वर्षे वाया गेली. आता निवडणुका पुन्हा आल्या, तरीही विकास रुसलेलाच आहे. तरुणांचा वापर निवडणुकी पुरता केला. शिराळ्यातील औद्योगिक वसहातीचा जाणीवपुर्वक विकास केला नाही. शिराळ्यातील ऐतिहासिक पुरातन मारुती मंदीर व किल्ला यांचे जतन करता आले नाही .यांना आता घरी बसवण्यासाठी एकत्र यावे.
यावेळी ४८ गावांसाठी भाऊसाहेब पाटील यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.