मृणाली हिरवे हिचा पन्हाळा-शाहूवाडी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार
पैजारवाडी : एस.एस सी.परीक्षेमध्ये (सेमी इंग्रजी ) ८०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेली पैजारवाडीच्या सरपंच सौ अलका हिरवे यांच्या कन्या कु.मृणाली महादेव हिरवे हीचा पन्हाळा-शाहूवाडी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शुभेच्छा देतांना दै.सकाळचे जेष्ठ पत्रकार राजू दळवी, दै.सकाळचे सहाय्यक वितरण व्यवस्थापक उत्तम महाडिक, दै.तरुण भारतचे पत्रकार भीमराव पाटील, दै.लोकमतचे पत्रकार संजय पाटील, दै.पुण्यनगरीचे पत्रकार दत्तात्रय बोबडे, व दै.पुढारीचे पत्रकार कृष्णात हिरवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.