नागाव फाट्याजवळ शिवज्योत घेवून जाणाऱ्या ट्रक ला अपघात : अपघातात ५ ठार ,तर २५ जण जखमी
कोल्हापूर : पुणे- बेंगलोर महामार्गावर शिवज्योत घेवून जाणाऱ्या ट्रक ला अपघात होवून, या अपघातात ५ जण ठार झाले असून, २५ जण जखमी आहेत. हा अपघात पहाटे साडे चार वाजणेच्या दरम्यान कोल्हापूर जवळील नागाव फाट्याजवळ घडला.
सांगली जिल्ह्यातील वालचंद कॉलेज चे हे विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी पन्हाळ्यावर शिवज्योत आणण्यासाठी आले होते. शिवज्योत घेवून परत जात असताना हि दुर्दैवी घटना घडली.
ट्रकमध्ये केतन प्रदीप खोचे ( वय २१ वर्षे ), सुमित संजय कुलकर्णी ( वय २३ वर्षे ), अरुण अंबादास बोंडे ( वय २२ वर्षे ), सुशांत विजय पाटील (वय २२ वर्षे ), प्रवीण शांताराम त्रीलोटकर ( वय २३ वर्षे ) या पाच जणांचा मृत्यू झाला असून ,२५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.