सराफ व्यापारी सदानंद नागवेकर यांचे निधन : रक्षाविसर्जन गुरुवार दि.४ जानेवारी २०१८ रोजी स.९.३० वा.
मलकापूर प्रतिनिधी : येथील प्रतिष्ठित सराफ व्यापारी सदानंद वसंतराव नागवेकर ( सावकर ) यांचे वयाच्या ६३ व्या अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. त्यांनी गजानन महाराज भक्त मंडळाचे अध्यक्ष, वसंतराव चौगुले पतसंस्थेचे चेअरमन ,कानसा खोरा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आदी पदे भूषवली आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनच गजानन महाराज मंदिर पूर्ण झाले. ते माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांचे खंदे कार्यकर्ते होते. अॅड. रवींद्र नागवेकर यांचे ते जेष्ठ बंधू होते.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सून, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. ४ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९.३० वा. आहे.