अनुष्का फौंडेशन चे अध्यक्ष श्री. नलवडे यांची एकसष्टी उत्साहात
बांबवडे : अनुष्का फौंडेशन सावे तालुका शाहुवाडी, चे अध्यक्ष श्री बाबुराव सुभाना नलवडे यांची एकसष्टी उत्साहात संपन्न झाली.
श्री बाबुराव नलवडे यांच्या एकसष्टी निमित्त स्नेह्सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्री नलवडे हि एक समाजशील व्यक्ती असून, त्यांनी अनुष्का फौंडेशन च्या माध्यमातून तालुक्यातील अनेक कुपोषित मुलांची वर्गवारी बदलण्यासाठी प्रति वर्षी १० विद्यार्थी ,याप्रमाणे गेली चार वर्षे दत्तक घेण्याचा, त्यांचा हा उपक्रम सुरु आहे.
त्याचबरोबर महिलांसाठी आरोग्याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री पांडुरंग पाटील फौंडेशन च्या अध्यक्षा सौ अनिता पाटील मॅडम यांना यांना आमंत्रित केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा सावे,बांबवडे येथील महिलांना चांगला फायदा झाला. तसेच गतवर्षी मरणोत्तर अवयव दान संदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन पर शिबीर आयोजित केले होते. त्यांच्या पत्नी यादेखील समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी नेहमीच आर्थिक मदत गरीब विद्यर्थ्यांना करत असतात.
असे हे श्री नलवडे दाम्पत्य स्नेह्सोह्ळ्याचे मुख्य आकर्षण होते. यावेळी सावे सेवा संस्थेचे माजी चेअरमन विकास पाटील,तसेच अनेक ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला.
यावेळी श्री विकास पाटील, सुहास पाटील ,संदीप पाटील, एस.टी.नलवडे, टी.डी. पाटील, रवींद्र पाटील, समीर पाटील व फौंडेशन चे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.