नामदेव गिरी यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी निवड
कोल्हापूर:शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते श्री.नामदेव गिरी यांची कोल्हापूर शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून निवड झाली असून याबद्दल त्यांना शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री.अरुणभाई दुधवडकर यांनी गिरी यांना निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर येथी हॉटेल अयोध्या येथे आयोजित बैठकीत श्री.नामदेव गिरी यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक, जिल्हा प्रमुख संजय पवार,आम.सत्यजित पाटील -सरुडकर , आम.प्रकाश आबिटकर , आम.उल्हास पाटील,शहर प्रमुख श्री.दुर्गेश लीन्ग्रस यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.नामदेव गिरी यांचे या निवडीबद्दल शाहुवाडी तालुक्यातील सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.त्यांच्यावर आता शाहुवाडी आणि पन्हाळा या दोन तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.